सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्रामस्थांनी सावध व सतर्क रहावे – धर्मराज सोनके

159
529
दांडगुरी : श्रीवर्धन शहरामध्ये झालेल्या घरफोडी सत्र व येणारे दिवाळी सण या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती मौल्यवान वस्तू खरेदी करीत असतो व बंद असणारे घर याचा गैरफायदा घेवून काही अनुचित प्रकार घडु नये यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने सतर्क व सावध राहून अज्ञात व्यक्तीची चौकशी  करून संशयास्पद प्रकार दिसल्यास पोलीसांना संपर्क साधण्याचे आवाहन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी केले. दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील ३८ गावातील  पोलीस पाटील, गावातील प्रत्येक समाजाचे प्रतिनीधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची तातडीची सभा दिघी सागरी पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, पोलीस उपनिरीक्षक पराग लोंढे, तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील, गावचे प्रतिनीधी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके म्हणाले की, नवरात्र उत्सव, गणपती, मोहरम सण मोठया गुण्यागोविंदाने सर्वांनी साजरे केले व पोलीस ठाण्यास चांगले सहकार्य देखील वेळोवेळी करीत आहात यापुढे देखील येणारे दिवाळी सण पारंपारीक पदधतीने साजरा करू या असे सांगताना दिवाळी किंवा दसरा या सणाच्या दिवशी  आपण मौल्यवान वस्तू खरेदी करतो सदर मौल्यवान वस्तू आपण जर बाहेर जात असाल तर ते सुरक्षित राहतील याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी श्रीवर्धन शहरामध्ये झालेल्या घरफोडीचे प्रकार आपल्या परीसरामध्ये टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी पोलीस बनून पोलीस ठाण्यास सहकार्य करावे गावामध्ये एखादा  संशयी   व्यक्ति  दिसल्यास त्याची चौकशी  करा व काही आक्षेपार्ह गोष्ट असल्यास तत्काळ पोलीस ठाण्याच्या 02147 224307 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सोनके यांनी केले.

159 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here