बदलापूरमध्ये एस.के.फिटनेस व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन

114
731

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव, ज्येष्ठ प्रशिक्षक मनिष अडिविलकर, विरेश धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

बदलापूर : व्यायामाची आवड असणार्‍या नागरिकांसाठी एस.के.फिटनेस ही व्यायामशाळा नव्याने बदलापूर पूर्वेला गांधी चौक परिसरामध्ये शशांक निगरे आणि कुणाल सत्वे या मेहनती होतकरू तरुणांनी सुरू केली असून त्याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव, ज्येष्ठ प्रशिक्षक मनिष अडिविलकर, विरेश धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
फिटनेस आणि व्यायाम बाबतीत जागरूक असणाऱ्या लोकांसाठी एस.के.फिटनेसच्या माध्यमातून उत्तम पर्याय बदलापूरातील नागरिकांना उपलब्ध झाला आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष भाजपा नेते राम पातकर, शिवसेना उपशहरप्रमुख युवा नेते प्रवीण राऊत, उद्योजक अनिल तिवारी, प्रशिक्षक किशोर शेट्टी, मनोज कालन, मि.इंडिया भास्कर कांबळे, मुंबई श्री राहूल तरफे, मि.ऑलिम्पिया बळी म्हात्रे, महाराष्ट्र श्री सुदर्शन खेडेकर, महाराष्ट्र श्री श्रीकांत भांडे, संदेश कोटियन, सुनील तिवारी, विशाल पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण जग आणि देशामध्ये कोरोनाने हाहाकार पसरविला असल्याने नागरिकांमध्ये आता शारिरीक तंदुरुस्तीचे महत्व वाढले. त्या दृष्टीने व्यायाम शाळा ह्या महत्वाचे कार्य करीत असून व्यायामामुळे शारिरीक तंदुरुस्ती सोबतच शरिराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम देखील होत आहे. असे एस.के.फिटनेसचे प्रशिक्षक कुणाल सत्वे यांनी सांगितले. पुरुष तसेच महिला वर्गासाठी देखील या व्यायामशाळेद्वारे योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, असे आवाहन एस.के.फिटनेसेद्वारे करण्यात आले.

114 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here