गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत

0
81

उरण :
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढते. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहिसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरीही माठ विकले न गेल्याने कुंभार समाजाचे मोठे अर्थिक नुकसान झाले. असे उरण तालुक्यातील मुलेखंड कुंभारवाडा येथील सुरेखा कुंभार यांनी सांगितले
मागच्या वर्षी उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन लागले इतर व्यवसायांप्रमाणे कुंभार व्यवसायही अडचणीत आला. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला माठ विक्रीसुरु झाली असतानाच लोक फ्रीज चे पाणीपिण्या ऐवजी माठातील पाण्याला अधिक पसंती देताना दिसून येत होते. परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने ग्राहक घराच्या बाहेर पडत नसल्याने कुंभार व्यवसाय अडचणीत येतो की काय? अशी अवस्था निर्माण झाली
माठ बनविण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यंदा वाढ झाली. भूशाच्या किंमतीही वाढ आली. असल्याने यंदा एका माठाच्या किंमतीत २० ते ४० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे माठ व्यवसाईकांनी सांगितले .सध्या मोठ्या प्रमाणत नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत आहेत.
पुन्हा कोरोनाने उन्हाळाच्या प्रारंभी डोके वर काढले पुन्हा लॉक डाऊन झाला तर व्यवसाय होईल की नाही? याची चिंता सतवत आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच जण घरात बसून असल्याने माठाकडे पाठ फिरवली. याचा फटका पारंपरिक कुंभार व्यावसायिकांनाही बसला. यंदा तरी मागील वर्षी केलेला खर्च निघेल आणि दोन पैसे मिळतील, हीच अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहे.
पुन्हा लॉकडाऊन झाला, तर व्यवसाय होईल की नाही याची चिंता सतवत आहे. उन्हाळ्यात माती आणि भुसा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठ बनवले. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. यामुळे सर्वच घरात बसून असल्याने माठाकडे पाठ फिरवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here