पनवेलमधील सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ.प्रकाश पाटील यांना आले गौरविण्यात

0
202

पनवेल : पनवेलमधील सुप्रसिद्ध असे लाईफ लाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश पाटील यांना त्यांनी आत्तापर्यंत टेस्ट ट्युब बेबी संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशिस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले आहे. यावेळी झी 24 तासचे निलेश खरे सुद्धा उपस्थित होते.
पनवेलसह रायगड, नवी मुंबई व कोकणातील प्रथम टेस्ट ट्युब बेबीला जन्म देणारे व आत्तापर्यंत 10 हजारापेक्षा जास्त जोडप्यांना अपत्य प्राप्ती करून देणारे डॉ.प्रकाश पाटील यांना झी 24 तास हेल्थ अ‍ॅण्ड वेल्थ या नावाने विशेष प्रशिस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देवून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यांना सदर अ‍ॅवॉर्ड मिळाल्यामुळे पनवेलचे नाव उंच स्तरावर गेले आहे. आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक संघटना, संस्थेच्या माध्यमातून गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांच्या मुलाखती सादर करण्यात आल्या आहेत. या त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवार, डॉक्टर्स असोसिएशन, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कुटुंबियांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.