Home ताज्या बातम्या कोरोना च्या तिसर्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात विशेष उपाययोजना...
विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : आता कोरोनाची देशभरात तिसरी लाट येऊ पाहते. तज्ञ व्यक्तींनी तिसऱ्या लाटेचा त्रास लहान मुले आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांना होणार आहे असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पूर्व खबरदारी म्हणून लहान मुलांच्या आरोग्य तज्ञांच्या सोबत चर्चा करून त्या प्रकारे आरोग्य यंत्रणेचे योग्य नियोजन करून लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर, ओपीडी सेंटर सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पनवेल महानगरपालिकेने गंभीरतेने विचार करावा आणि तातडीने ठोस पावले उचलावी अशी सूचना विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. तसेच सदरचा विषय पत्रव्यवहार करून पालकमंत्री नामदार आदीतीताई तटकरे यांच्याकडे सुद्धा या विषयात त्वरित ठोस पावले उचलण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली होती.
गुरुवार दिनांक १३ मे २०२१ रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये खासदार मा.श्री.श्रीरंग(अप्पा) बारणे, आमदार मा.श्री.बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री सुधाकर देशमुख, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, प्रांताधिकारी श्री.दत्तात्रय नवले, प्रांताधिकारी मा.सौ.भोसले मॅडम, पनवेलचे तहसीलदार मा.श्री.विजय तळेकर, विरोधी पक्षनेते मा.श्री.प्रितम म्हात्रे, नगरसेवक मा.श्री.गणेश कडू, नगरसेवक मा.श्री.सतीश पाटील, पनवेल महानगरपालिका प्रशासन, सिडको प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नामदार आदितीताई तटकरे यांनी लहान मुलांच्या आरोग्य विषयक सेवेमध्ये विशेष उपाययोजनेत पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासन ह्यांना १००% लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यात पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा असाव्यात असे आदेश दिले आहेत. लहान मुलांच्या हॉस्पिटल प्रशासना सोबत बोलून कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी करावी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले.