ताउकतै (Tauktae) चक्रीवादळ नगरपंचायत प्रशासना तर्फे माणगांवकरांसाठी हाय ॲलर्ट

2835
9640

उतेखोल/माणगांव :
रविवार दि. १६ मे आणि सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी हिंद महासागरातुन अरबी समुद्राकडे आलेले ताउकतै चक्रीवादळा मुळे (Cyclone Tauktae) रायगड जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. याकाळात जोरदार वारे मुसळधार पाऊस होऊ शकतो. यासाठी माणगांवकरांनी सतर्क राहुन स्वतःची व स्वतःचे कुटुंबाची काळजी घ्यावी. नागरिकांनी या कालावधित कोणतीही मदत लागल्यास माणगांव नगरपंचायत आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक ०२१४०२६३०५६ तसेच ९६०७५६४३२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जाहीर आवाहन माणगांव नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच या कालावधित कोणीही घरा बाहेर पडु नये, तसेच घरात पिण्याचे पाणी व खाण्याच्या पदार्थांचा पुरेसा साठा करुन ठेवणे, नागरिकांनी स्वतःची वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करुन ठेवणे. कारण मोठी झाडे पडुन गाडीचे नुकसान होणार नाही, मुसळधार पाऊस पडते वेळी घरातील काचेच्या खिडक्यांपासुन दूर राहावे, धोकादायक व कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांनी या कालावधित सुरक्षित ठिकाणी स्वतःची राहणेची व्यवस्था करणे, ज्यांचे घरांची छप्परे पत्र्याची आहेत त्यांनी सदर पत्र्यांची दुरुस्ती करुन घेणे जेणे करुन नागरिकांचे जिवीतास हानी पोहचणार नाही, खोलगट भागात व ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचते त्याभागातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःचे घरातील सामानाची काळजी घ्यावी, आपल्या घराचे आजुबाजुस उंच झाडे असतिल नागरिकांनी सावध सतर्क राहावे. अफवांकडे लक्ष देऊ नये वा अफवा पसरवु नये, शुन्य जीवीत हानी हेच प्रशासनाचे धेय्य आहे. यासाठीच नागरिकांनी सतर्क राहुन सुचनांचे पालन करीत नगर पंचायतीस सहकार्य करावे.

Attachments area