मुंबईला जायचं थांबवायचं असेल तर इथे प्रकल्प आले पाहिजेत- ना.अजितदादा पवार

0
232

तळा नगरपंचायत नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

तळा : तळा नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे,खा.सुनील तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे,ॲड राजू साबळे,सुभाष केकाणे,जिल्हाधिकारी किसन जावळे,जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे नगरसेवक नगरसेविका स्थानिक जनप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणाला इतरांच्या तुलनेत मिळाले पाहिजे ही माझी नेहमी भूमिका असते येथे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले निसर्गाला कुठलाही धक्का न लावता चांगल्या कंपन्या आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.१९९५ साली शिवसेना आणि भाजप सत्तेवर आली एनराॅन अरबी समुद्रात बुडविणार अशी घोषणा केली आता कोकणाचा वाळवंट होणार असा अप्रचार केला १० हजार कोटींचा वीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही आणणार होतो, तो ही हाणुन पाडला जर तुम्हाला मुंबईला जायचं थांबवायचं असेल तर इथे प्रकल्प आले पाहिजेत आणि त्यासाठी अदिती आणि सुनील तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .मी कोकणाला नेहमीच प्राधान्य देतो असे सांगून त्यांनी आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मी पण शेतकरी आहे राज्यपाल महोदयांना कृषकचे उद्घाटनाचे मी निमंत्रण दिले आहे.बारामतीला खूप मोठे कृषी प्रदर्शन आम्ही भरवतो यामध्ये आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची,कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची ,कमी खताचा वापर करून जास्त उत्पादन कसं घ्यायचं जात चा वापर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमतेचा वापर कसा करायचा आता ते तंत्रज्ञान विकसित झाले आहे ७० टण ऊस काढणारा शेतकरी आता ११० टन ऊस काढायला लागला आहे इतर पण पिके आपण काढू शकतो फळपीक भाजीपाला यांचे उत्पादन काढण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
अजित दादा पुढे म्हणाले की,तळा आज प्रगतीच्या वाटेवर आहे तळा नगरपंचायत इमारतीस आठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यातील ४ कोटी अदितीने आणले आहेत अजून चार कोटी मिळायला पाहिजेत म्हणून आज अर्थमंत्र्यांना टिकाव टाकायला त्याच कारणासाठी बोलावले दिसतंय कारण अर्थमंत्र्यांनी टिकाव टाकल्यावर अर्थवट काम ठेवून कसं चालेल त्यामुळे हे काम वेळेत आणि दर्जेदारपणे होणे अपेक्षित आहे या कामाला कुठलाही निधी मी कमी पडू देणार नाही येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर चंडिका देवी ट्रस्ट जीर्णोधारसाठी १ कोटी रुपये देण्याचेही त्यांनी आश्वासन यावेळी दिले.
खा.सुनील तटकरे यांनी महायुतीमध्ये सामील झाल्या नंतर या परिसराचा विकास करण्यासाठी लोकसभेमध्ये प्रयत्न सुरू होते स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असताना आता भारत सरकार कडून दिघी प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये तळा तालुक्यात प्रदूषण विरहित कारखाना प्रस्तावित करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले तालुक्यामध्ये शैक्षणिक दालन,दळणवळणाची साठी लागणारे रस्ते तयार केले अदिती पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर पर्यटक या तालुक्यात येतील या पद्धतीने काम केले असल्याचे सांगून महापालिका निवडणूक असताना अजितदादा यांनी वेळ काढून येथे आले त्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले यावेळी ना.अदिती तटकरे यांनी देखील मार्गदर्श केले.
भूमिपूजनाच्या प्रारंभी अजित पवार यांनी नगरपंचायतीच्या कामकाजातील सुधारणा, स्थानिक विकास आणि नागरिकांशी जवळीक वाढवण्याच्या दृष्टीने या नवीन इमारतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या इमारतीच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ आणि आधुनिक पद्धतीने चालवता येईल असे सांगितले.
कार्यक्रमात आपल्या भाषणात नागरिकांच्या सुविधा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. नवीन इमारतीसाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्याचा उपयोग कार्यालयीन सुविधा, सभागृह, डिजिटल सेवा केंद्र आणि नागरिकांच्या सुविधा सुधारण्यासाठी केला जाणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांनी उत्साहात नव्या इमारतीच्या बांधकामाच्या सुरुवातीस शुभेच्छा दिल्या. हा टप्पा तळा नगरपंचायतीच्या विकासाचा एक महत्त्वाचा मानला जात आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन अधिक सशक्त व कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे.