Home ठळक बातम्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली; बंदी असताना जड अवजड वाहनांची वर्दळ सुरुच
अलिबाग :
कुरूळ पासून सहाण बायपास मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्याय आहे . त्यामुळे जड व अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून आले आहे.
अटी शर्तीवर बंदी असलेले अवजड वाहने बेकायदेशीर रित्या रस्तावरून शनिवारी सकाळी धावत होती. त्यामुळे सहाण ते बेलकडेपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका सकाळी प्रवाशांना बसला. या मार्गावर वाहतूक व अन्य सुरक्षा यंत्रणा असतानाही त्यांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतूकीवर दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.