मुरुड-काशिद बीचवर शुकशुकाट ! जोरदार पावसाचा परिणाम

0
3

कोर्लई :  मुरुड जंजिरा पर्यटनात ऑगस्ट अखेरच्या विकेंड ला शनिवारी मुरुड-काशिद बीचवर तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी शुकशुकाट दिसून येत होता.
मुरुड-काशिद बीचवर पर्यटकांची मागील विकेंडला गर्दी पाहावयास मिळाली होती.गौरी गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर मुरुड आजुबाजूच्या परिसरात कोकणवासीयांचा सणात उत्साह दिसून येत आहे.गेल्या आठवड्यापासून अधूनमधून तर काही वेळा जोरदार वा-यासह पढणा-या पावसाचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत असून काही ठिकाणी शुकशुकाट दिसून येत होता.
पर्यटनात पुणे, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नागपूर, धुळे यवतमाळ अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून व देश विदेशातून पर्यटक मुरुडला भेट देत असतात.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील रुपेरी वाळू, निळाशार समुद्र, समुद्रामध्ये मध्यभागी असलेला पद्मदुर्ग, मुरुडला असणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा यामुळे पर्यटक मुरुड कडे आकर्षित होत आहे. काशीद बीचवर असणारी रुपेरी वाळू, उंच उंच सुरुची झाडे त्यामुळे पर्यटक काशीद बीचला ही मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. परंतु ऑगस्ट अखेरच्या चौथ्या विकेंडला शनिवारी पर्यटनात मुरुड -काशिद बीचवर शुकशुकाट दिसून येत होता.