Home ठळक बातम्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे जेएनपीए महामार्ग सह सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडी, सर्व...
उरण : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद केल्याने शुक्रवारी सकाळपासूनच जेएनपीए बंदरात आणि बंदरातून जाणारी हजारो कंटेनर वाहने अडकून पडली होती.
जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर धुतुम, चिर्ले ते गव्हाण फाटा अशा तब्बल बारा ते पंधरा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कंटेनरच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. उरण शहराकडे उरणच्या पूर्व भागाकडे जाणारे असे सर्वच मार्ग बंद झाले होते. त्यामुळे जाणारे येणारे प्रवाशी जवळजवळ चार ते पाच
तास वाहतूक कोंडीत अडकून राहिले होते. तर या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका हा व्यवसायिकांसह वाहतूक दारानां बसला असल्याची
खंत व्यक्त केली आहे.
मराठा आंदोलकांचा ताफा मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी जेएनपीटी महामार्गकडून आल्याने सर्व अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे जेएन पीए च्या व्यवसायावर बसला.वाहतूकदारांना या वाहतूक कोंडीचा मोठया प्रमाणात बसला. जेएनपीएट घेऊन जाणारे कंटेनर आणि आणि आयतीचे आलेले कटेनर आणण्यासाठी विलंब झाला. वाहतूक कोंडी मुळे निर्यातसाठी जाणारे कंटेनर व्हेसलं चा कटाफ झाल्याने शट आउटझाले त्यामुळे हा सर्व भुदंड वाहतूकदारांवर बसत आहे.
तसेच वाहतुक कोंडी मध्ये वाहने अडकल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला. या वाहतूक कोंडीत उरणवरून जाणारे आणि येणारे अनेक प्रवासी नोकर वर्ग वाहनेही अडकले होते. कोंडी दूर करण्यासाठी उरण, न्हावा शेवा, गव्हाण फाटा वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू होते.
पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर वाहनांच्या तीन-तीन रांगा लागल्या होत्या. यातील एक रांग सुरू करण्यात उरणच्या वाहतूक पोलिसांना यश आले आहे. आत्ता वाहतूक कोंडी सुरळीत होत असली तर मात्र या मराठा आंदोलनामुळे जेएनपीए च्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
जेएनपीए मार्गावर अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र या वावा लागला आहे. कंटेनर वेळेवर न पोहचल्यामुळे जे चार्जेस लागतात ते ही आमच्यावर पडतात. अशा कोणत्याही कारणाने पोर्ट ची वाहतूक बंद न ठेवता सुरळीत ठेवावी जेणेकरून वाहतूकदारांना भुदंड बसणार नाही.
पंढरीनाथ गांजवे
रायल ट्रान्सपोर्ट प्रमुख
आंदोलनामुळे वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आत्ता उरण वाहतूक आणि न्हावा शेवा वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.नवीमुंबई कडेजाणारी अवजड वाहतूक आता मात्र बंद ठेवण्यात आली आहे. रात्री सोडली जाईल
जी एम मुजावर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा वाहतूक