उरण अपघात प्रकरणातून चालकांनी बोध घेण्याची गरज – पो.उपनिरीक्षक संजय पवार

0
2

उरण : प्रतिनिधी
नुकत्याच घडलेल्या उरण करंजा रस्त्यावरील अपघाताने तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.याच पार्श्वभूमीवर उरण वाहतूक शाखेकडून उरण पुर्व विभागातील कोप्रोली नाक्यावर व्यवसाय करणार्‍या रिक्षा चालक तसेच दुचाकीस्वार आदिंना शिस्तीचे धडे देण्यात आले यावेळी उरण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार , आणि सोबत दोन अधिकारी उपस्थित होते तर रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गिरीश म्हात्रे, उपाध्यक्ष राजू गावंड आदी उपस्थित होते.
उरण करंजा या मार्गावर रविवारी एक तरूणी आपल्या दुचाकी वरून जात असताना एका मालवाहू लाॅरी ला ओव्हर टेक करत असताना रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे तोल जाऊन सदर तरूणी पडली असता लाॅरी चे मागील चाक तिच्यावरून गेल्याने त्या तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे , त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने आपल्या वाहनाचे आणि समोरून जाणाऱ्या वाहनामधील अंतर हे सुरक्षीत आहे का हे तपासावे आणि दोन वाहनाच्या मध्ये सुरक्षित असावे आणि कुठल्याही वाहनाच्या पुढे जात असतांना सदर चालकाला सचेत करावे त्याला हाॅर्न वाजवून आपण पुढे जात असल्याने दोघांमधील अंतर ठेवून वाहन पुढे काढावे अजीबात घाई करू नये असे संजय पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
पुढे बोलतांना त्यांनी दुचाकी स्वार यांनी ही सतर्क रहावे घाई घाईत दुचाकी चालवू नये जेणेकरून आपल्यामुळे कोणाला अपघात होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी तसेच कुठल्याही रस्त्यावर आडवी तीडवी गाडी उभी करू नये जेणे करुन रस्त्यावर वाहतूक ठप्प होणार नाही
गाड्या नियमबाह्य उभ्या केल्याने अनेकदा प्रवासी आणि गाडी चालकांत शाब्दिक चकमक होत असते त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो , त्यामुळे आपले वाहन व्यवस्थित रस्त्याच्या कडेला उभे करावे जेणेकरून वाहतूकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.