कोविड प्रतिबंधक उपाययोजनांकरिता जिल्ह्यात 13 कोटी 19 लाख निधी वितरणास शासनाची मान्यता

646
1715
Mumbai: NCP MLA Aditi Tatkare arrives to take oath as MLA in Mumbai on Nov 27, 2019. (Photo: IANS)

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा

अलिबाग :  चालू आर्थिक वर्षात हे कोविड-19 उपाययोजनांसाठी विविध जिल्ह्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणीची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय छाननी समित्यांनी छाननी करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शिफारस केली आहे.  पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या सविस्तर आढाव्यानिशी रु.13 कोटी 19 लाख 9 हजारांचा आराखडा प्रस्तावित केला होता. त्याचा शासन स्तरावर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला असून जिल्ह्यासाठी रु. 13 कोटी 19 लाख 9 हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निधीमधून जिल्ह्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.