मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये भव्य रक्तदान शिबिर

0
150

पनवेल :
शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनेनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष दादा घरत यांनी खारघर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी गोवंडी मुंबई येथील पल्लवी ब्लड सेंटरच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात महाराष्ट्राला वाचाविल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने एका कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारलेले नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या रक्तसाठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेनाप्रमुख या नात्याने आदेश दिले होते. या आदेशाला कळंबोली, खारघर, कामोठे, पनवेल आदी ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीसुद्धा आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यास कोरोना रुग्णांसाठी एक मदत होईल, या भावनेतून रविवारी खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये रायगड जिल्हाप्रमुख शिरीष दादा घरत यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष दादा घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका संघटक भरत पाटील, जिल्हा संघटीका सौ.रेखाताई म्हात्रे, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, ग्रामीण तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, ग्रामीण तालुका संघटक रामदास पाटील, ग्राहक कक्ष उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे, तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर, विभागप्रमुख विश्वास पेटकर, माजी तालुकाप्रमुख आत्माराम गावंड, माजी सभापती देविदास पाटील, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, प्रभाकर गोवारी, ग्राहक कक्ष शहरप्रमुख किरण तावदरे, अरुण कुरूप, युवासेना समन्वयक अभिमन्यू पाटील, प्रसिद्धी प्रमुख पराग मोहिते, कळंबोली युवासेना अरविंद कडव, तळोजा विभागप्रमुख मुरलीधर म्हात्रे, कळंबोली उपशहरप्रमुख जमील खान, महेश गुरव, के.के.कदम, सचिन मोरे, पिंट्या कड्गारी, माजी शाखाप्रमुख महेंद्र दुबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.