ऑलकार्गो मधील कामगारांसाठी पगारवाढीचा करार

0
174

कामगार नेते महेंद्र घरत यांचा पगारवाढीचा सपाटा कायम

प्रतिनिधी:
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्य न थांबता कोणत्याही परीस्थीतीत कामगारांना न्याय मिळवून देताना दिसत आहे. जानेवारी २०२१ पासुन वेगवेगळ्या कंपन्यांतील कामगारांसाठी १० पगारवाढीचे करार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. मे. ऑलकार्गो लॉजिस्टीक्स, जे.एन.पी.टी उरण या सि.एफ.एस मधील मे. स्वामी समर्थ शिपींग मधील कामगारांसाठी ८२०० ते ९५०० रूपयांचा पगारवाढीचा करार संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला.
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्व कौशल्याने, मुळ मालकांना मध्यस्थी करण्यास भाग पाडुन कामगारांना चांगली पगारवाढ मिळवून दिली. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षीसाठी ८२०० ते ९५०० रूपये पगारवाढ, एक ग्रॉस सॅलरी बोनस, अडीच लाख रूपयांची मेडिक्लेम पॉलीसी, कॅन्टीन सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. तसेच फेस्टीव्हल अॅडव्हान्स देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या पगारवाढीच्या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि.के.रामण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, संजय ठाकूर, दिपक ठाकूर, सुजित म्हात्रे, लंकेश ठाकूर, मनोहर ठाकूर, अजित ठाकूर तर व्यवस्थापनातर्फे अजिंक्य हातीशकर (पार्टनर), अभिजित पाटील (कायदेशिर सल्लागार), जयेश शिंदे (एच.आर. मॅनेजर) तसेच कामगार प्रतिनिधी प्रशांत ठाकूर, राजाराम पाटील, ज्ञानदीप ठाकूर, प्रथमेश पाटील, संदीप पाटील, जितेंद्र पाटील, उत्कर्ष ठाकूर व इतर कामगार उपस्थीत होते. कामगारांनी यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत व कार्यकारीणीचे आभार मानले.