पनवेल : नुकत्याच आलेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात अस्मानी संकट कोसळले आहे. त्यांची घरदारे उध्वस्त झाली आहेत. लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे महाड जवळील बिरवाडी भागातील आजूबाजूच्या वाड्यांमध्ये अन्नछत्र सुरू करुन या भागातील ग्रामस्थांना मोठा मदतीचा हात देण्यात आला आहे. लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे या भागातील ग्रामस्थांसाठी रोज सकाळी व सायंकाळी सुमारे हजार जणांना तयार जेवण देण्यात येते. आत्तापर्यंत ८ हजारांहून जास्त जणांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला आहे. लायन अध्यक्ष सुयोग पेंडसे, सचिव मधुकर भगत, लायन अशोक गिल्डा, लायन नंदकिशोर धोतरे यांनी या भागात राहून खूप परिश्रम घेतले. तसेच लायन लुईस कॉलेस्ते, लायन संजय पोतदार, लायन नागेश देशमाने, लायन स्वाती गोडसे, लायन सुरभी पेंडसे, लायन शोभा गिल्डा, लायन भावना जसवानी यांनीही हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. ला.डि. ३२३१ ए २ चे माजी प्रांतपाल ला.के.जे. पॉल, जी.एस.टी. चेअरमन ला. मनिष लडगे, रिजन चेअरमन ला. ज्योती देशमाने, नोडल ऑफिसर जी.एस.टी.ला. संजय गोडसे यांनी सुद्धा या अन्नछत्राला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी बिरवाडी येथील वैभव सोहनी, शेखर सोहनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.