कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही- आ.महादेव जानकर

0
107

माणगांव : रायगड, रत्नागिरी, सातारा येथील पूरग्रस्त तालुक्याचा पाहणी दौरा केल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांनी माणगांव येथील विश्रामगृहात सोमवार दि.2 रोजी पत्रकार यांच्या कडे संवाद साधला त्यावेळी बोलले की, कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. या बाबतz केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लवकरच संपर्क करणार असून पूरग्रस्त गावांमध्ये सरकारची कार्यवाही कमी पडते. सामाजिक संघटना तसेच सर्वच राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळत असून आमच्या सुद्धा पक्षाकडून जेवढ मदतीच काम करता येईल तेवढं कार्य माझे पदाधिकारी करत आहेत.   ज्या पूरग्रस्त विभागात गेलो त्या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना रियल पंचनामे करण्यासाठी सांगितले असून लवकरच शासनाकडून मदत मिळाली पाहिजे इतकी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. अशी वेळ परत कोकणावर येऊ नये याकरिता उपाययोजना केंद्र व राज्य शासनाने केली पाहिजे. सरकार कोणचे ही असू परंतु लवकरच मदत होणे गरजेचं आहे. कोकणातील पाणी हे दुष्काळी तालुक्यातील गावांना दिले तर तेथील शेतकरी सदन होऊ शकतो. कोकणातील तरुण हा मुंबईला न जाता बागायती, फळबाग, शेती करून सुखी राहू शकतो. येथील तरुणांनी कर्ज घेऊन शेती व्यवसाय केला पाहिजे परंतु इथला तरुण नोकरीनिमित्त मुंबई जातो हे दुर्दैव आहे.कोकणातील पाणी हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील दुष्काळ असणाऱ्या तालुक्यात दिले तर त्या विभागात असणारी पाणी समस्या कायम दूर होऊ शकते. याबाबत रासपच्या वतीने केंद्र व राज्य सरकार जवळ चर्चा करण्यात येईल. पूरग्रस्त ठिकाणी त्यांनी भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास आले की, ज्या ठिकाणी कोण पोहचत नाही त्या ठिकाणी पहिला पत्रकार पोहचतो नंतर सर्व यंत्रणा पोहचते. यांना कोणी वाली नसतो. या पुरामध्ये व्यापारी वर्गाचे खूप मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना परत व्यवसाय करण्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब रूपणवर,कोकण प्रदेश अध्यक्ष  भगवान ढेबे,रायगड जिल्हा संपर्कप्रमुख  संतोष ढवळे,रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ठाकूर,माजी जिल्हा अध्यक्ष  संपत ढेबे, माणगाव तालुका अध्यक्ष  रविंद्र सुतार, सूर्यकांत टेंबे उपस्थित होते.