उरण पंचायत समितीवर शेकापक्षाचा झेंडा

0
25

उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश म्हात्रे, उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड.

उरण : उरण तालुक्यातील पंचायत समितीच्या सत्तेवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सभापती पदी महाविकास आघाडीच्या शेकापचे महेश म्हात्रे आणि उपसभापती पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी ( दि११ मार्च) रोजी संपन्न झाली.पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाकडे चार सदस्य तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे तीन सदस्य आहेत. त्यामुळे आघाडीच्या ठरलेल्या वाटाघाटी नुसार सभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे तर उपसभापतीपद शिवसेना (उबाठा) गटाकडे गेले आहे.सभापतीपदासाठी शेकापचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे तर तर उपसभापती पदासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे सदस्य परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.निवडणूक बुधवारी दुपारी २ वाजता पार पडली असून उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.यावेळी त्यांनी सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन केले. शासनाच्या वतीने गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील नायब तहसीलदार रवींद्र सानप विस्तार अधिकारी विनोद मिंडे उपस्थित होते.निवड होताच शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद घरत ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते तथा शेकाप तालुका चिटणीस रवि घरत, तालुका संघटक बी एम डाकी, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रुपेश पाटील,काका पाटील,अनंत घरत,,भारत राज थळी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सभापती महेश म्हात्रे व उपसभापती परेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.