आ.गोगावले यांनी पोलादपूरच्या पूरबाधित कुटुंबांना केले अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
188

पोलादपूर : पोलादपूर शहरातील पूरबाधित कुटूंबियांना महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना आ. गोगावले यांच्यासोबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर शहरप्रमुख सुरेश पवार, माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक तसेच विभागप्रमुख लक्ष्मण मोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलादपूर शहरातील पूरग्रस्तांची आस्थापूर्वक विचारपूस करीत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. पुरबाधित कुटूंबांना कोणतीही मदत लागल्यास खात्रीपुर्वक करण्याचे पोलादपूरकरांना आश्वासन देत आ.गोगावले यांनी अडचणीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे असून पुरामुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.