खा.सुनील तटकरे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांची भेट

0
166

अल्पव्याजदरात दीर्घमुदतीची कर्ज अन् एनडीआरएफ बेस कॅम्पची मागणी

पोलादपूर : रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवार, दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी देशाचे गृहमंत्री तसेच सहकारमंत्री ना.अमित शहा यांची भेट घेऊन लोकसभा मतदार संघातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लघुउद्योजक, दुकानदार, उद्योगपती, छोटे व्यावसायिक तसेच अन्य रोजगार यांना कमीव्याज दरामध्ये दीर्घमुदतीचे कर्जवाटप करण्यासोबतच तातडीने एनडीआरएफ बेस कॅम्पची मागणी उभारण्याच्या मागणीची दोन वेगवेगळी निवेदने दिली आहेत.

कोकणातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांनी अर्थव्यवस्थेचे गाडे व्यवस्थित पूर्वपदावर आणण्यासाठी खा.तटकरे यांनी या निवेदनामध्ये सात विविध सुचना करून या सुचनांवर केंद्रसरकारने कार्यवाही केल्यास सर्व बाधित उद्योग व व्यापारउदीम यांना चालना मिळण्याचा दावा केंद्रीय सहकारमंत्री ना.अमित शहा यांच्याकडे केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांना दिलेल्या निवेदनानुसार खा.सुनील तटकरे यांनी, रायगड रत्नागिरी या लोकसभा मतदार संघामध्ये अतिवृष्टी, रेल्वे दूर्घटना, इमारत दूर्घटना, भूस्खलन तसेच औद्योगिक अपघात अशा विविध कारणांनी सातत्याने जिवितहानी तसेच वित्तहानी होत असून अनेकांना अपंगत्व येऊनही हजारो संसार उदध्वस्त झाल्याकडे लक्ष वेधले आहे. रायगड व रत्नागिरी नद्यांच्या महाप्रलयांमुळे नद्यांच्या परिसरात होणारे जिवितांचे नुकसान याबाबत खा.तटकरे यांनी एनडीआरएफ बेस कॅम्पची गरज विशेष महत्व अधोरेखित करून तातडीने पूर्ततेची मागणी केली आहे.