घोट गाव येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरु करा – परेश ठाकूर

0
168

पनवेल :  पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव येथिल रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

        सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव, सिद्धी करवले, कोयनावळे, तुर्भे व आजूबाजूच्या गावांमधील नागरीकांची वाढती लोकसंख्या पाहता गावातील नागरीकांना कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्याने घोट गावातील व आजुबाजूच्या गावातील नागरीकांना लसीकरणाकरीता पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर अशा शहरात लसीकरण करण्याकरीता जावे लागते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होऊन लसीकरण करण्याकरीता येणाऱ्या महिला वर्ग तसेच जेष्ठ नागरीकांना टोकन घेण्याकरीता तात्कळत रांगेत उभे राहवे लागते. त्यामुळे गावातील महिला व जेष्ठ नागरीकांना मोठ्याप्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने घोट गाव व आजुबाजूच्या गावातील रहिवाशी घोट गाव

येथिल रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्राची उभारणी करण्याकरीता सातत्याने मागणी करीत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत घोट गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने लसीकरण केंद्राची उभारणी करावी व त्यासंदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दयावेत, असेही निवेदनात अधोरेखित केले आहे.