44 आदिवासी जोडपी अडकली विवाह बंधनात

0
129

खोपोलीत पार पडला सहजसेवा फाऊंडेशनच्या वतीने अनोखा सामुदायिक विवाह सोहळा

खोपोली – राज साळुंके
गेली दीड वर्षे कोरोनाने घातलेल्या थैमाना मूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, व लग्नसोहळ्यावर शासनाने बंदी व बंधने त्यामुळे या काळात अनेकांचा उत्साह मावळला आहे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने विवाह सोहळ्याचे आदीवासी व ठाकूर समाज बांधवांना आयोजन करणे शक्य होत नसल्याने या समाज बांधवाची समस्या लक्षात घेत खोपोलीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सहजसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी 5 सप्टेंबर रोजी खोपोलीत 44 आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळा आयोजन केल्याने आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तर अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली व वधूवरांना आशीर्वाद दिले.
कोरोनात उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांना रोजगारापासून वंंचित राहावे लागल्याने बहुतांशी नागरिकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असून याचा मोठा फटका आदिवासी व ठाकूर समाजाला बसल्याचे पाहायला मिळते आहे, आदिवासी व ठाकूर समाज बांधवाची समस्या लक्षात घेत खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी 5 सप्टेंबर रोजी खोपोलीत सामुदायिक 44 जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला या उपक्रमात आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला या सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा सुमन औसारमल, वंदनाताई मोरे, खोपोली चे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर चे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्यासह अनेक सर्व पक्षीय नेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत वधू वरांना आशिर्वाद दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराती, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी.निरंजन, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी यांच्यासह जवळपास 60 सभासदांनी अथक मेहनत घेत हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.