पावसाच्या मुसळधारेत दिडदिवसांच्या बाप्पांना भावपुर्ण निरोप

0
218

रोहा : रोहा तालुक्यात गेली तीन दिवस सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेतही तितक्याच भावपुर्ण वातावरणात दिड दिवसांच्या 698 बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी बाप्पांच्या आगमना पासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही सततच्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला. तरीही ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आणि कोरोनाचे नियम पाळत भक्तगणांनी अवडत्या बाप्पाला निरोप दिला.
दुपारी 3 वाजल्यानंतर वाजत गाजत एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते. रोहा पोलिसांकडुन दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त ठेवली होती. भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत कुंडलिका नदी किनारी भावपुर्ण आणी भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले. यावेळी कोण्ताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी रोहयाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी चोख बंदोबस्त ठेवले होते. रोहा तालुक्यात दिडदिवसांच्या एकुण 698 बाप्पांना विसर्जन करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.