महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळा कलंबूसरे येथे भूमिपूजन

0
237

उरण :  उरण तालुक्यातील चिरनेर जिल्हा परिषद गटातील विद्यमान सदस्य बाजीराव परदेशी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून प्राथमिक शाळा कळंबूसरे येथे वर्ग खोली बांधण्याचे भूमीपूजन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, तथा कामगारांचे नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते झाले.उरण तालुक्यातील कळंबूसरे हे एक छोटसं गाव असून या गावातील प्राथमिक शाळेला खोल्यांची आवश्यकता असल्याकारणाने रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांच्या जिल्हा परिषद निधीतून हे काम मंजूर करण्यात आला आहे. तरी कामाचे भूमिपूजन रायगड मधील विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे अवघी जनता पाहते सतत समाजामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मदत करणारे गोरगरिबांचे कैवारी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. वर्ग खोल्यांसाठी आवश्यक निधी मिळाल्याने तसेच भूमीपूजन झाल्याने शिक्षक, ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष उमेश भोईर, उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, कुलदीप नाईक, भालचंद्र पाटील, विकी पाटील , रामदास जाधव, संतोष राऊत, रणजीत पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका, सुदर्शन जाधव, ऋषिकेश भेंडे व ताराबाई नाईक हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भेंडे यांनी केले. एकंदरीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.