शासन आपल्या दारी कार्यक्रम” जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
14

अलिबाग :  शुक्रवार दि.5 जानेवारी 2023 रोजी दु. 12.30 वा माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे ता.माणगाव येथे “शासन आपल्या दारी” कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्री.उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री,कु.आदिती वरदा सुनिल तटकरे, खासदार श्री.श्रीरंग बारणे, खासदार श्री.सुनिल तटकरे, विधान परिषद आमदार सर्वश्री श्री. जयंत पाटील, श्री. निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा आमदार सर्वश्री श्री. भरत गोगावले, श्री. प्रशांत ठाकुर, श्री. रविंद्र पाटील, श्री. महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, श्री. महेंद्र दळवी, कुलगुरु डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे प्रा.डॉ. कारभारी काळे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्यास्थळी जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात येणार आहे. याठिकाणी नागरीक व लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख खाजगी कंपनी यांचे स्टॉल देखील असणार आहेत.

जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.