अक्षय पात्रकडून महाराष्‍ट्रातील पनवेल येथे नवीन किचनचे उद्घाटन

0
24

नवीन पनवेल : अक्षय पात्र फाऊंडेशन या शालेय मुलांना मध्‍यान्‍ह भोजन देण्‍यामध्‍ये अग्रणी असलेल्‍या संस्‍थेने महाराष्‍ट्रातील पनवेल येथे त्‍यांचे नवीन केंद्रीकृत किचनचे उद्घाटन केले. नवीन युनिट अक्षय पात्रचे देशातील ६८वे किचन आणि महाराष्‍ट्रातील ४थे किचन आहे. हे नवीन किचन संस्‍थेला सरकारचा प्रमुख शालेय आहार उपक्रम पीएम पोषणची अंमलबजावणी करण्‍यास आणि वर्गामध्‍ये लागणाऱ्या भूकेचे शमन करत शिक्षणाला चालना देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये ७० शाळांमधील १०,००० मुलांना भोजन देण्‍यास सक्षम करेल.

उद्घाटन समारोहासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा कॅबिनेट मंत्री, दीपक केसरकर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका आयुक्‍त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलिसचे डीसीपी पंकज दहाणे, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त भरत राठोड, पनवेल महानगरपालिकेच्‍या सहाय्यक आयुक्‍त सुवर्णा दखणे, पनवेल महानगरपालिकेचे माजी-सभापती . परेश ठाकुर, पनवेल महानगरपालिकेच्‍या प्रशासकीय अधिकारी किर्ती महाजन आणि उपशिक्षणाधिकारी. सुनिल भोपाळे यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अक्षय पात्रच्‍या वतीने अक्षय पात्र फाऊंडेशन महाराष्‍ट्रचे अध्‍यक्ष अमितसाना दासा आणि अक्षय पात्र फाऊंडेशनचे सीईओ श्रीधर वेंकट कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

पौष्टिक आहाराच्‍या माध्‍यमातून वर्गातील भूकेचे शमन करण्‍यासह शिक्षणाला चालना देण्‍याच्‍या दिशेने फाऊंडेशनच्‍या प्रवासातील हा संस्‍मरणीय क्षण ठरला. अक्षय पात्रचे आश्रदाते कुमारी वंदना व श्री रवी टिळक, सर्व मंगल ट्रस्‍ट आणि सक्‍सेना फॅमिली फाऊंडेशन यांनी हे स्‍वप्‍न सत्‍यात आणण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.. शालेय मध्‍यान्‍ह आहार विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी अत्‍यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान यांची पीएम पोषण योजना उत्तम उपक्रम आहे आणि या थोर कार्यामध्‍ये सामील असलेल्‍या अक्षय पात्र फाऊंडेशन सारख्‍या संस्‍थांना प्रेरित केले पाहिजे. अशा उपक्रमांना पाठिंबा देणे हे सरकारचे कर्तव्‍य आहे आणि मी तुम्‍हाला आश्‍वासन देतो की, महाराष्‍ट्र सरकार नेहमी तुम्‍हाला पाठिंबा देत राहिल,” असे शालेय शिक्षण व मराठी भाषा कॅबिनेटमंत्री, महाराष्ट्र सरकार दीपक केसरकर म्‍हणाले.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत अक्षय पात्र फाऊंडेशन महाराष्‍ट्रचे अध्‍यक्ष अमितसाना दासा म्‍हणाले, ”आम्‍हाला आज पनवेलमध्‍ये आमच्‍या नवीन किचनचे उद्घाटन करण्‍याचा अभिमान वाटतो. आमचे अँकर आश्रयदाते कुमारी वंदना व यूएसमधील . रवी टिळक, सर्व मंगल ट्रस्‍ट आणि सक्‍सेना फॅमिली फाऊंडेशन यांच्‍या पाठिंब्‍याशिवाय हे शक्‍य झाले नसते. आम्‍ही अविरत पाठिंब्‍यासाठी त्‍यांचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो. तसेच आम्‍ही आपल्‍या देशाच्‍या भावी पिढीचे पालनपोषण करण्‍याची ही संधी दिल्‍याबद्दल भारत सरकार आणि महाराष्‍ट्र सरकार यांचे देखील आभार मानतो. अक्षय पात्र किचन्‍स या फक्त भोजन तयार केल्‍या जाणाऱ्या इमारती नाहीत. हे किचन्‍स आशेचा किरण आहेत आणि त्‍यामधून आमचा दृष्टिकोन ‘भारतातील कोणतेही मूल भूकेमुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये’ दिसून येतो.”

नवीन उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या किचनची दररोज जवळपास २०,००० पौष्टिक आहार शिजवण्‍याची क्षमता आहे. सुरूवातीला, हे किचन ७० स्‍थानिक महापालिका व जिल्‍हा पंचायत शाळांमधील मुलांना १०,००० हून अधिक गरमागरम, पौष्टिक मध्‍यान्‍ह भोजन देईल आणि त्‍यानंतर अधिकाधिक मुलांना सर्व्‍ह केले जाईल. पोषण व विविध पाककलांचे मिश्रण राखत बारकाईने तयार करण्‍यात आलेले मेनू स्‍थानिक चवींची पूर्तता करते. तसेच या मेन्‍यूमध्‍ये महाराष्‍ट्र सरकारने जारी केलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार १२ हून अधिक विविध पाककलांचा समावेश आहे, जसे मिक्‍स डाळ, पुलाव, छोले, जीरा राइस, सांबार, खिचडी व मिठाईसह केळी. पनवेल किचनमधून दर्जा व सुरक्षितता दिसून येते, जे एफएसएसएआयकडून ५-स्‍टार रेटिंग फूड सेफ्टी स्‍टॅण्‍डर्डससाठी आयएसओ प्रमाणित आहे, तसेच एफएसएसएआयकडून इट राइट कॅम्‍पस् म्‍हणून मान्‍यताकृत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पामधून अक्षय पात्र फाऊंडेशनची तरूणांचे पालनपोषण करण्‍याप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते. तसेच यामधून समुदाय सहभागाला चालना देणे, आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि उज्‍ज्‍वल, अधिक पोषणदायी भविष्‍याच्‍या दिशेने प्रवासामध्‍ये शाश्‍वत पद्धतींना प्रगत करणे याप्रती अक्षय पात्रचे सहयोगात्‍मक प्रयत्‍न दिसून येतात.