श्री साई देवस्थान साईन‌गर वहाळचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

0
7

       उरण – चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४६ मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुडीपाडवा सणाचे तसेच श्री साई देवस्थान साई नगर वहाळ च्या १२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री साई मंदिर वहाळ ता. पनवेल जि. रायगड येथे दि ८ एप्रिल व ९ एप्रिल २०२४ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.८ एप्रिल २०२४ रोजी काकड आरती,बाबांचे मंगल स्नान – महाआरती,साईबाबा अष्टतोत्तर शत ना‌मावली जप,श्री साई चरित्र ग्रंथ अखंड पारायण तर ९ एप्रिल रोजी बाबाचे मंगल स्नान, महाआरती, अष्टोत्तर शत नामावली, भजन, महाप्रसाद, बाबाचा पालची सोहळा असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात,उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. दूर दूरवरून साई भक्त गुडीपाडवा निमित्त साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी श्री साई मंदिर,साईनगर वहाळ येथे आले होते. भाविक भक्तांनी रांगेत शिस्तीने उभे राहून देव दर्शन घेतले.

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा. लहान मुलावर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीकोणातून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा श्री साई मंदिर, साईनगर वहाळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण आर. टी. ओ. सचिव विद्यासागर हिरमुखे व अन्न व औषध महाराष्ट्र सचिव संदीप पतंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नारायण शेठ घरत, काशिनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती ताई पाटील, साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, बाळाराम पाटील, जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी, रायगड भूषण राजू मुंबईकर,शिरीष कडू, ह. भ. प.रामकृष्ण महाराज, सुदिन पाटील, सुशील पाटील, धनंजय घरत, माजी सरपंच अरुण दापोलकर, तैमूर पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.