अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी”उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला” उत्स्फूर्त प्रतिसाद

0
6

अलिबाग – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित “उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली” साठी मतदार, युवक, महिला अधिकारी -कर्मचाऱ्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. याप्रसंगी मतदान जागृतीबाबत पथनाट्याचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते.


जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली अलिबाग शहरातील विविध भागातून नेण्यात आली. यावेळी नवमतदार, युवक व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले.
बाईक रॅलीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. घार्गे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, लायन्स क्लबचे सदस्य यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रिझम संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाट्य कलाकारांनी सादर केले.