‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन

0
6

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य हे तरुण पिढी मध्ये रुजविणे अत्यंत गरजेचे आहे, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांपर्यंत हे विचार पोहचतील…. रणदीप हुड्डा ह्यांच्या कष्टातून ही न भूतो न भविष्यती अशी अजरामर कलाकृती ह्या चित्रपटाच्या रूपाने जन्माला आली आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रातील ओरियन मॉल, के. के. सिनेमा आणि लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे तब्बल २००० नागरिकांसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटच्या विशेष शो चे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पनवेल शाखा च्या वतीने करण्यात आले होते. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सात्यकी सावरकर (सावरकरांचे नातू) उपस्थित होते, त्यांचे स्वागत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओझे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, ऍड. नरेश ठाकूर, ब्रिजेश पटेल, संजय भगत, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, नितेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.