Home ठळक बातम्या जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केली रायगड लोकसभा लोकसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रूमची पाहणी
रायगड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघा अंतर्गत महाड, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन पाहणी केली. तसेच या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.
डॉ. जावळे यांनी महाड, दापोली, गुहागर, पेण या विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रभेटी देऊन पाहणी केली. तसेच मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसेच स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला.
मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महाड डॉ. ज्ञानेश्वर बाणापुरे, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, पोलीस निरीक्षक श्री तडवी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.