स्व.मीनाक्षीताई पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

0
21

माथेरान : अलिबाग मधील सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या, गोरगरीब जनतेच्या तारणहार, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे शुक्रवार दि.२९ मार्च रोजी निधन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या रायगडच्या तीन आमदारांसह दि.५ रोजी अलिबाग(पेझारी) येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आ. जयंत पाटील, माजी आ. पंडीत पाटील, मिनाक्षी पाटील यांचे सुपूत्र शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील आदी पाटील कुटंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी कर्जत खालापूर मतदार संघाचे  आमदार महेंद्र थोरवे,महाडचे आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी हे उपस्थित होते.