जेएनपीए आर्थिक वर्ष 2023-24 साठी टोटल ट्राफिक 85.82 दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचली

0
10

उरण : जेएनपीएने 2023-24 या आर्थिक वर्षात 6.43 दशलक्ष टिईयूएसची आतापर्यंतची सर्वाधिक थ्रूपुट नोंदवून ऐतिहासिक टप्पा गाठला. 2022-23 चा 6.05 दशलक्ष टीईयू अंक ओलांडून, बंदराने आपला यशस्वी प्रवास सुरू ठेवला आहे. त्या तुलनेत, मागील वर्षीच्या याच कालावधीत एकूण थ्रूपुटमध्ये लक्षणीय 6.27 टक्के वाढ नोंदवून विक्रमी थ्रूपुट नोंदविला आहे.एप्रिल-2023 ते मार्च-2024 या कालावधीत जनेपप्रा येथे हाताळलेली टोटल ट्राफिक 85.82 आहे दशलक्ष टन, जे मागील आर्थिक वर्षातील 83.86 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2.33 टक्क्यांनी अधिक आहे.

यामध्ये 78.13 दशलक्ष टन कंटेनर ट्राफिक आणि 7.70 दशलक्ष टन बल्क कार्गोचा समावेश आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत अनुक्रमे 76.19 दशलक्ष टन कंटेनर ट्राफिक आणि 7.67 दशलक्ष टन बल्क ट्राफिक होते.कंटेनर ट्राफिकचे ब्रेकडाउन दर्शवते की BMCT येथे 2.03 दशलक्ष 2027781टिईयूएस ,एपीएमटी येथे 1.59 दशलक्ष टीईयूएस, एनएसआयसीटी येथे 1.13 दशलक्ष टीईयूएस , एनएसआयजीटी येथे 1.11 दशलक्ष टीईयूएस , एनएसएफटी येथे 0.56 दशलक्ष टीईयूएस आणि एनएसडीटी येथे 7,978 टीई यूएस कंटेनर हाताळण्याचा विक्रम केला.

जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ, यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला हा महत्त्वाचा क्षण जाहीर करताना खूप अभिमान वाटत आहे. हे बंदर एक्झिम व्यापारासाठी प्रमुख प्रवेशद्वार म्हणून स्थापित करण्याच्या आमच्या समर्पणाला अधोरेखित करते. हे यश सेंट्रलाईज पार्किंग प्लाझा, सिंगल विंडो क्लीयरन्स आणि इतर विविध उपक्रमांसह उच्च दर्जाच्या सेवा देण्याच्या आमच्या कार्यसंघाच्या अतूट वचनबद्धतेला प्रतिबिंबित करते, ज्यामुळे व्यवसाय अधिक सुलभ होतो. मी आमच्या सर्व भागीदारांचे आणि भागधारकांचे त्यांच्या निरंतर विश्वास आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जनेपप्रा देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्याच्या आपल्या ध्येयासाठी कायम प्रयत्नशील आहे.हा ऐतिहासिक टप्पा आज सर्व जनेपप्रा टर्मिनल ऑपरेटर आणि व्यापारी संघटनांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.