Home ताज्या बातम्या खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकित पेणसह रायगड जिल्ह्यातील विविध...
पेण- पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे कार्यालय छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रेल्वेच्या उच्चस्तरिय आधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये खारपाड़ा, गडब, आमटेम येथे नव्याने स्टेशन मंजूर करणेसाठी तातडीने प्रस्ताव दिल्लीला पाठविण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना खा. तटकरे यांनी दिले. हा प्रस्ताव स्वतः रेल्वेमंत्र्यांना भेटून मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी खा. तटकरे यांनी दिले. तसेच खारपाडा रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव दिल्ली येथे मंजुरीसाठी यापूर्वी पाठवण्यात आला होता परंतु जिते रेल्वे स्टेशन ते खारपाडा पर्यंतचे अंतर कमी होत असल्याने तो प्रस्ताव मान्य केला नाही. मात्र खारपाड़ा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे अशा सूचना खा. तटकरे यांनी रेल्वेचे महाप्रबंधक यांना दिल्या असून त्यानुसार रेल्वे प्रशासन अधिकारी या स्थानकांची पहाणी करून पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे महाप्रबंधक सीएसएमटी, मुंबई यांनी दिली.
मुंबई येथे रेल्वेच्या उच्चस्तरिय आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पेणकरांना रेल्वे संदर्भात भेड़सावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. यावेळी पेणकरांचा रेल्वे प्रवासाची समस्या सोडवून प्रवास सुखकर व्हावा या करीता ‘पनवेल-वसई-पनवेल’ व ‘पनवेल-डहाणू-पनवेल’ मेमू ट्रेन या पेण पर्यंत एक्सटेंड करण्यात याव्यात., दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५ व १०१०६) ही गाडी कोविड काळ पूर्वी पेण व हमरापूर स्थानकात थांबा घेत असे. तरी पुन्हा एकदा तिला पूर्ववत पेण स्थानकात येथे थांबा मिळावा., मांडवी एक्सप्रेस (१०१०३ व १०१०४), नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५ व १६३४६), मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९ व १२६२०), कोकणकन्या एक्सप्रेस (१०१११ व १०११२) या एक्सप्रेस गाड्यांना पेण स्थानकात थांबा मिळावा., दिवा रत्नागीरी दिवा गाडीला हमरापूर स्थानकात थांबा मिळावा तसेच प्लॅटफॉर्म वरील फूट ओव्हर ब्रिज हा प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला झालेला आहे. तरी स्थानिकांच्या मागणीनुसार सदर फोटोवर ब्रिज प्लॅटफॉर्मच्या मध्यावर बांधण्यात यावा. “माझ पेण” या संघटने तर्फे माडण्यात आलेल्या समस्यांवर रेल्वे प्रशासन सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी रेल्वे महाप्रबंधक यांना वरील सर्व समस्यां तातडीने सोडविण्यासाठी प्रस्ताव तयार करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचे आदेश दिले असून पेणकरांच्या रेल्वे संदर्भातील प्रश्न रेल्वेमंत्र्यांना भेटून मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी खा. तटकरे यांनी दिले.
या बैठकिला माझ पेण संघटनेचे तर्फे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गणेश लक्ष्मण तांडेल, व दिलीप मुकुंद पाटील आणि पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत, पेण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मोकल, सचिन तांबोळी हिरामण गायकर, रवींद्र म्हात्रे, विश्वनाथ बेकावडे, दिलीप पाटील, राजश्री पाटील, गणेश गायकर आदि उपस्थित होते.