माणगावातील वाहतूक कोंडीचा गणेश भक्तांना आश्चर्याचा धक्का !

0
81

माणगाव :
वर्षाच्या १२ महिने महिन्याच्या तीसही दिवस मुंबई – गोवा मार्गावरील माणगावची वाहतूक कोंडी सर्वश्रुत असून गणेशोत्सव काळात तर ही डोकेदुखी शंभरपट नाही तर हजारपट म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही. अशा प्रकारें गणेशोत्सव काळात, वाहतूक पोलिस खात्याला धडकी भरवणारी माणगाव मधील वाहतूक कोंडीची समस्या, यावर्षी पोलिस प्रशासनाच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सेवा फाउंडेशन माणगाव या संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे वाहतुकीचा धसका घेतलेल्या कोकणवासीय गणेश भक्तांनी आभार व्यक्त करत त्यांना खूप धन्यवाद देताना दिसत होते.


मुंबई – गोवा महामार्ग, दिघी – पुणे महामार्ग यासोबत काही राज्य मार्ग आणि स्थानिक दळणवळणाचे मार्ग यांचा एकत्र संगम होतो ते रायगड जिल्ह्यातील माणगाव शहर हे गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीचे आगार बनले असून वर्षाच्या १२ महिने महिन्याच्या ३० दिवस ही डोकेदुखी प्रशासनासह वाहतूक पोलीस खात्याला अधिक डोकेदुखी आहे. यामध्ये कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या आश्वासना शिवाय गेली अनेक पावसाळे पाहणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था म्हणजे हा महामार्ग कोणाच्या अख्तरीत येतो की नाही, याचा वाली कोणी आहे की नाही असे वाटल्याशिवाय राहणार नाही अशी भयानक अवस्था गेली अनेक वर्ष कोंकणवासिय भोगत असून कोणत्याही सत्ताधाऱ्यांना किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीना याबद्दल कोणतेही सोयर- सुतक असल्याचे दिसून येत नाही. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशा आश्वासनाखेरीज अनेक पावसाळे पाहणारे या मार्गाचा वाली कोण ? असा संतापजनक सवाल कोकणवासीय (कोकणचे भाग्यविधाते, विकासाचा महामेरू, कार्यसम्राट, कैवारी) कोकणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारत आहेत. अशा महाभयंकर महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी माणगाव मधील वाहतूक कोंडीचा धसका घेत असून गणेश उत्सव कालात अनेक पटीने वाढणाऱ्या वाहतुकीतून कसा मार्ग निघेल या विवंचनेत असणाऱ्या गणेश भक्तांना यावर्षी मात्र आश्चर्याचा धक्काच बसला असून न अडकता न ताटकलता सहजपणे मार्गस्थ होत आले. त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या नियोजनबद्ध, अप्रतिम, मार्गदर्शनाखाली सेवा फाउंडेशन संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांनी अफाट परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत असून माणगावातून समाधानकारक प्रवास करून मार्गस्थ होणाऱ्या कोकणातील लाखो गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनासह वाहतूककामी सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यात अग्रेसर ठरणाऱ्या सेवा फाउंडेशन संस्थेच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद देताना त्यांचे कौतुक करताना दिसून आले.