सुसज्ज कोव्हिड उपचार सोयी सुविधांसाठी आपला प्रामाणिक प्रयत्न : आदिती तटकरे

600
2111

उतेखोल/माणगांव :
पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची रविवार रोजी माणगांव उप जिल्हा रुग्णालय येथे धावती भेट. यावेळी कोव्हिड संदर्भात सद्यस्थिती बाबत सविस्तर माहिती घेत चर्चा केली. तसेच माणगांव येथे नविन ऑक्सिजन निर्मीती प्लाण्ट बाबत १५ × १५ चौरस मिटर जागे संदर्भात चौकशी करुन सोयीस्कर ठिकाणी हा प्लाण्ट उभा करण्यासाठी योग्यती कार्यवाही करण्याच्या संबंधितांना सुचना केल्या. सुसज्ज कोव्हीड केंद्र व आवश्यक अति दक्षता विभाग आणि सोयी सुविधांची येथे तातडीने निर्मीती केली जाईल तसेच माणगांव मोर्बा येथील अल्फा या खाजगी रुग्णालयाची पाहणी करुन येथेही कोव्हिड उपचार केंद्र करण्यासाठी योग्यती पूर्तता करा असेही सुचित केले.
तसेच नगरपंचायत कार्यालय जवळील जिल्हा परिषदे च्या शाळेत लसीकरण केंद्रा बाबत सविस्तर माहीती घेत रुग्णालयास आवश्यक ते अहर्ता प्राप्त मेडिकल स्टाफ अगदी डाॅक्टर, नर्स तसेच लसीकरण संबधित रजिस्ट्रेशन साठी आवश्यक ऑपरेटर रुजु करुन घेण्यासाठी योग्यती कारवाई तातडीने करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिक्षक डाॅक्टर प्रदीप इंगोले यांस केल्या. तसेच रेमडिसीवीरच्या बाबतीत योग्य आणि आवश्यकता असली तरच याचा वापर करावा, असे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी पालकमंत्री यांस प्राप्त माहिती अवगत करुन दिली. माणगांव उपजिल्हा रुग्णालयासाठी जिल्ह्यातील इतरांचे तुलनेत सर्वसोयी सुविधा देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे पालकमंत्री यांनी म्हटले.
बारामतीत नाही पण माणगांवात पहिल्यांदा ऑक्सिजन चा क्रायोटँक आपण सर्वात आधी बसवला, कारण माणगांव मध्यवर्ती असल्याने शेजारील इतर तालुक्यांतील जनतेलाही त्याचा लाभ होईल. तसेच पत्रकारानी माणगांवात पहिल्यांदाच दोन दिवस लसीकरण बंद पडले बाबत विचारले असता, उद्या पासुन जवळपास पाचशे लसींची तरतुद होईल असे सांगत जिल्ह्यातच तुटवडा आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कालच खासदार सुनिल तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पत्रकारांनीच लसीकरण जलदगतीने व रजिस्ट्रेशन सुलभ व्हावे, नविन लसीकरण केंद्राची सोय करावी अशी मागणी केली होती, त्याची पुर्तता झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत हे केंद्र उद्यापासून सुरु होणार आहे.
आजही वृध्दाश्रमातील वयोवृध्दांचे लसिकरण संदर्भात पत्रकारांनी पालकमंत्री यांचे निदर्शनात आणताच, प्रांताधिकारी यांनी योग्यती व्यवस्था केली जाईल असे पालकमंत्र्यांना आश्वासीत केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक लसीकरणचे नोंदणी कामी स्वयंस्फुर्तीने मदत करतील अशी त्यांची मागणी होती त्यासही प्रांतांनी मान्यता दिली आहे. याप्रसंगी तहसिलदार बि. व्हाय. भाबड नगरपंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे तसेच पंचायत समिती चे गटविकास अधिकारी गाढवे व उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रदिप इंगोले तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाने, माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, व माजी सभापती, नगरसेवक दिलीप जाधव, रत्नाकर उभारे, नितीन वाढवळ, जयंत बोडेरे, हेमंत शेट तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी महामुद धुंदवारे, सुमित काळे, रविंद्र मोरे व पत्रकार उपस्थित होते