वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी दिले मोराला जीवदान

697
1913
mayur

उरण :
चिर्ले – गावठाण परिसरात रात्रीच्या नऊ वाजताच्या सुमारास जंगली कुत्र्यांच्या तावडीतून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोराची सुटका करून त्याला जीवदान देण्याचे काम केले.
चिर्ले – गावठाण येथील चंद्रकांत मढवी यांच्या फार्म हाऊस मध्ये राहत असलेला राजेश याला रात्रीच्या 9 वाजताच्या सुमारास काही जंगली कुत्रे मोराचा पाठलाग करत असताना दिसले त्यांनी लगेचच चिरले येथील संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांना फोनद्वारे ही घटना कळविली आनंद मढवी यांनी क्षणाचा ही विलंब न लावता त्याचे सहकारी पंकज घरत, सुमित मढवी, दिलीप, शुभम मढवी,मढवी,विनीत मढवी, मयूर मढवी,बंटी शेळके यांना घेऊन तिथे पोहचले आणि त्या जंगली कुत्र्यांच्या तावडीतून मोराची सुटका केली. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे त्यामुळे जखमी झालेल्या मोराची माहीती त्यांनी उरण वनाधिकारी शशांक कदम यांना देऊन त्याच्यावर उपचार करून मोराला जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनपाल डी डी पाटील,वनरक्षक मेजर किरण देवकर, मेजर सूरदास धांडे, सुप्रिया कसबे उपस्थित होते.