कळंबोली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अधिकारी कर्मचार्‍यांसह कुटुंबियांना स्टीमर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप

440
1116

पनवेल : सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये व ते सर्व सुरक्षित रहावेत या उद्देशाने कळंबोली पोलीस ठाण्यांतर्गत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना स्टीमर, सॅनिटायझर, मास्क, सी व्हीटॅमीन टॅबलेट आदींचे वाटप परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कळंबोली पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांचे कोरोनापासून बचाव होणेकरिता कळंबोली पोलीस ठाणे मध्ये पोलीस उप आयुक्त परि 2, पनवेल शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आदींच्या हस्ते स्टीमर, सॅनिटायझर, एन 95 मास्क, सी व्हिटॅमिन टॅबलेटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस नाईक ते पो. हवा. पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांना फीत लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस उप आयुक्त, परि 2, पनवेल शिवराज पाटील यांनी कोरोना पासून स्वतः चा व कुटुंबियांचा बचाव करण्याकरिता दक्षता घेणेबाबत मार्गदर्शन केले. सदर वेळी वपोनि संजय पाटील यांच्यासह 4 अधिकारी, 60 पोलीस अंमलदार सामाजिक अंतर ठेऊन उपस्थित होते.