पेण :
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉक डाऊन व संचार बंदी लागू करण्यात आली आहे.तर साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे या धर्तीवर संचार बंदी करण्यात आली आहे. वडखळ येथे पोलीसानी वडखळ पोलिस निरिक्षक बाळा कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली कडक नाका बंदी करण्यात आली आहे.
वडखळ येथील अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती . तर महामहर्गावरुन फिरणा-या वाहनांची तपासणी करून विनाकारण फिरणा-या वाहनावर दडात्मक कारवाई करण्यात आली.
तालुक्यात कोरोना विषाणूचा गर्दीद्वारे संसर्ग होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासना कडून घेण्यात येत आहे वडखळ येथे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने ती रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक नाका बंदी करण्यात आली विनाकारण मोटार सायकल, चार चाकी वाहने फिरत असल्याने तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या अनुषंगाने करण्यात आलेल्या आदेशानुसार कडक नाका बंदी करून विनाकारण फिरणा-या वाहनांवर दडांत्मक कारवाई करण्यात आली.