कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहनेते परेश ठाकूर यंदाही वाढदिवस साजरा करणार नाही

24
210

पनवेल : कोरोना वैश्विक महामारीचे गांभिर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते व भाजपचे युवानेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. १८ मे रोजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. मात्र गेल्या वर्षांपासून कोरोना आजाराचे प्रसार पाहता सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने बंदी घातली आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून सर्वजण कोविड-१९ या जागतिक संकटाचा सामना करीत आहोत. सर्व स्तरावर त्यावर मात करण्याचे युद्धपातळीवर अविरतपणे प्रयत्न होत आहेत. शासनाने सुद्धा लॉकडाऊनचे कडक निर्बंध सर्वत्र लागू केलेले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार पाहता यंदा वाढदिवस न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने ०६ जून रोजी पनवेल परिसरात किमान ०१ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
कोविड महामारीचे गांभिर्य लक्षात घेऊन यंदा वाढदिवस साजरा करणार नाही. कोणीही, कोठेही आणि कोणत्याही स्वरूपात माझा वाढदिवस साजरा करू नये, तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची तसदी घेऊ नये. स्वतःची व कुटुंबाची आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. आणि देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.                                                                                                       – परेश ठाकूर, सभागृहनेते – पनवेल महानगरपालिका