श्री साई नारायणबाबा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

0
186

पनवेल :  भगवती साई संस्थानचे संस्थापक आणि पनवेल येथील साई मंदिरचे निर्माणकर्ते जगदगुरु बाल योगी श्री साई नारायण बाबा यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
नारायण भगवती अय्यर उर्फ श्री साई नारायण बाबा (85) यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी पनवेलमध्ये पसरताच साई भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेकांनी फोन करून संबंधित संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली. विविध सामाजिक उपक्रम, हजारो जणांचे मोफत विवाह, कोरोना काळात केलेले मोफत धान्य वाटप, विधवा माता भगिनींना केलेली मदत तसेच साई बाबांवर केलेले प्रवचन, अनेक निराधार गोरगरीबांना वेळोवेळी केलेली मदत यामुळे श्री साई नारायण बाबा पंचक्रोशीसह देशात, परदेशात प्रसिद्ध होते. देश-विदेशातून अनेक भक्त त्यांचे दर्शन, आशिर्वाद व प्रवचन ऐकण्यासाठी पनवेलमध्ये येत असत. गोरगरीबांसाठी त्यांनी अनेक सोहळे व कार्यक्रम राबविले होते. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, डोळे तपासणी शिबीर आदी उपक्रम राबविले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते घरातच होते. नुकतेच त्यांना कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.