स्व.माणिक जगताप यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, नसीम खान यांची श्रध्दांजली

0
177

पोलादपूर : कोकण दौऱ्यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष भाई जगताप, नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांनी पोलादपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांना सकाळी शोकसभेपूर्वी श्रध्दांजली वाहिली. यानंतर नियोजित सभेवेळी पोलादपूर तालुक्यातील सर्वपक्षियांनी कोणत्या एका पक्षाचा नाही तर ऐंशी हजार मतदारांचा नेता गेला आहे, अशा शोकाकूल भावना दिवंगत माणिकराव जगताप यांच्याप्रती व्यक्त केल्या.
दिवंगत माजी आ.माणिकराव जगताप यांच्या अनेक सभा ज्या कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये गाजल्या. त्याच सभागृहामध्ये आज त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माणिकरावांचे मार्गदर्शक शिरिष साबळे, व्यापारी निवास शेठ, शेकापक्षाचे बोरावळे सरपंच व कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती वैभव चांदे, राजिप सदस्या सुमन कुंभार, शिवसेनेचे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, देवळे सरपंच अनिल दळवी, साखरचे अनिल मालुसरे, देवळेचे माजी सरपंच प्रकाश कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, भाजपाचे मनोज भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाय.सी.जाधव, संभाजी साळुंखे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय सलागरे, उपसभापती शैलेश सलागरे, मोहन शिंदे, सरचिटणीस रघुनाथ वाडकर,बाळाराम मोरे, चंद्रकांत मोरे,अकबर वलीले, शिक्षक विनय हाटे आणि दीपक सकपाळ, ज्ञानोबा केसरकर, निजामपूर विभागाचे जनार्दन मानकर, लक्ष्मण धाडवे, डॉ.राजेश शिंदे तसेच स्व.माणिकराव जगताप यांचे मित्र ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी शब्दसुमनांनी श्रध्दांजली वाहिली.