महेंद्र घरत यांच्या प्रयत्नाने गव्हाण – शेलघर जोड रस्ता तातडीने दुरुस्त

0
99

उरण : प्रतिनिधी
खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील गव्हाण – शेलघर या रस्त्यावरून न्हावा – शिवडी सेतूच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या अवजड डंपर,पोकलन व क्रेन्सच्या वाहतुकीमुळे उलवा नोड सेक्टर – 16 येथील सुरू असलेल्या गगणचुंबी इमारतींच्या कामासाठी सुरू आसलेली अवजड वाहतूक यामुळे दयनीय अवस्था झाली होती.त्यामुळे मोटारसायकल,चारचाकी वाहनांसह अन्य प्रवासी वाहनांना या रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले होते.
मात्र इंटकचे राष्ट्रीय सचिव तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी एमएमआर डीए व एलअँटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधित रस्त्याची पाहणी करायला बोलावून सदरच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यता येथे सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करून न्हावा – शिवडी सेतूचे काम बंद पाडले जाईल,असा इशारा देण्यात होता.
त्यामुळे अवघ्या तीन – चार दिवसातच या गव्हाण – शेलघर रस्त्याची दुरुस्तीचे काम एलअँटी कंपनीने हाती घेऊन पूर्णत्वास नेल्याने या मार्गावरील पादचारी आणि वाहनचालकांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून,कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रयत्नांना यश आल्याने गव्हाण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरत यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.