खांदा कॉलनी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

0
154

पनवेल :खांदा कॉलनी येथे रोटरीतर्फे नेत्र ज्योत हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र सुरू होते. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांच्याकडून माहिती मिळाली की, हे लसीकरण केंद्र बंद झाले आहे, तरी काही संस्थांनी लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी माहिती मागितली असेल तर सर्व आवश्यक बाबी तपासून तातडीने परवानगी देऊन खांदा कॉलनी मधील नागरिकांसाठी तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेलचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

       खांदा कॉलनी येथे लसीकरण केंद्र तातडीने सुरू करणे, खांदा कॉलनी सेक्टर ५, गुरुद्वारा संस्थेला लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, घरकाम करणाऱ्या महिला, सिक्युरिटी गार्ड ह्यांच्याकरिता लसीकरण कॅम्प सुरू करावे, विभागा विभागात एक दिवसीय लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात यावे. अशा मागण्या यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांच्याकडून करण्यात आल्या आहेत

खांदा कॉलनी येथील लसीकरण केंद्र पुन्हा नव्याने सुरू करावे या मागणीसाठी आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तिथे नगरसेविका सौ.सारिकाताई भगत, सौ.प्रीतीताई जॉर्ज, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, मा.उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील, मा.नगरसेवक शिवाजीराव थोरवे, खांदा कॉलनी शेकाप अध्यक्ष अनिल बंडगर,खांदा कॉलनी शेकाप कार्याध्यक्ष योगेश कोठेकर , शेकाप  युवानेते मंगेश अपराज, देवा मढवी, जॉनी जॉर्ज  उपस्थित होते.
यावेळी खांदा कॉलनी मध्येच लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू होईल असे आनंद गोसावी यांनी सांगितले. यावेळी रोहिंजन ,घोट कॅम्प, धानसर व इतर ठिकाणी सुद्धा लसीकरण केंद्र आवश्यकतेनुसार सुरू करावे अशा मागणीचे निवेदन नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिले