तळा :
तळा पोलीस ठाण्याचे निरिक्षक श्री.गेंगजे यांची बदली झाल्यानंतर पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस निरिक्षक गोविंद ओमासे यांनी स्विकारला आहे.श्री.ओमासे यांची नियुक्ती झाल्यानंतर तळा प्रेस क्लबच्या वतीने श्री.ओमासे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, पत्रकार.पु.गो.मुळे, किशोर पितळे, संध्या पिंगळे, श्रीकांत नांदगावकर, नझीर पठाण आदि मान्यवर उपस्थित होते. यापुर्वी ओमासे यांनी डहाणु आणि नगर येेेेथे पोलीस निरिक्षक म्हणुन जवाबदारी पार पाडली आहे तळ्यासारख्या निर्सगरम्य दुर्गम शांत आणि गुन्हेगारी प्रवृत्ती कमी असलेल्या भागात त्यांची बदली झाली आहे .तळा तालुक्यातील शांतता सुरक्षा टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असुन नागरिकांसह पत्रकारांनी पोलीसांना सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगीतले. तळा प्रेस क्लब कडुन सन्मानित करण्यात आल्या बद्दल त्यांनी आभार मानले. तालुक्यातील घङणारया घडामोडीं बाबत सकारात्मक सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पत्रकारांनी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.