जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

0
253

      उरण : रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेंद्र घरत यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.  नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी निवड होताच राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची सदिच्छा भेट घेतली.
जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र घरत यांची निवड जाहीर झाल्या क्षणापासून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घरी चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. अनेकांनी त्यांचे मोबाईल द्वारे अभिनंदन केले. महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी महेंद्र घरत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांनी रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्या संदर्भात विचारविनिमय करून पुढील कार्यकरमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. यावेळी महेंद्र घरत यांच्या बरोबर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.