मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हिरकणी ग्रुपने मारली बाजी

0
116

पनवेल : सतत कामात व्यस्त असलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि दोन घटका करमणूक व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने रविवारी (दि. 5) मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक आणि चित्रा वाघ यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत महिलांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, अर्चना परेश ठाकूर, मृणाल खेडकर, माजी नगराध्यक्ष प्राची मुकादम, स्मिता वाणी, माजी जि. प. सदस्य प्रिया मुकादम, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, उपाध्यक्ष समिना साठी, अनुसया घरत, योगिता भगत, चिटणीस शिल्पा म्हात्रे, शहर सरचिटणीस नीता माळी, सरचिटणीस सपना पाटील, उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, स्नेहल खरे, अंजली इनामदार, कोषाध्यक्ष आदिती मराठे, सदस्य ज्योती देशमाने, मयूरी उन्नडकर, मनीषा बहिरा, नीता मंजुळे, इंदुमती म्हात्रे, अक्षया चितळे, सारिका म्हात्रे, श्वेता खैरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या, स्पर्धक महिला उपस्थित होत्या.
असा आहे निकाल – मंगळागौर स्पर्धेत हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या स्वच्छंद सामाजिक विकास संस्था या गु्रपला तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक पटकावलेल्या तळ्यात मळ्यात ग्रुपला दोन हजार रुपये आणि सन्मामचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नंदादेवी ग्रुप आणि जय अंबा भवानी गु्रपला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले, तर शीला चिंतामणी टिळक यांना विषेश सहभाग म्हणून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण अनघा तांबोळी, प्रा. हेमाली शेडगे आणि मयूरी शिंदे यांनी केले.

कोरोना काळात सगळ्यात पहिली कोरोना वॉरियर्स असेल तर प्रत्येक घरातील महिला. तिने दिवसभर राबत कुटुंबीयांना खाऊपिऊ घातले आणि काळजीही घेतली. त्यामुळे या आरोग्यलक्ष्मीला वंदन केले पाहिजे.
-चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा

मंगळागौर स्पर्धा आयोजित करून महिलांना संधी दिल्याबद्दल भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलचे कौतुक आणि या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केल्याबद्दल स्पर्धक महिलांना धन्यवाद.
-माधवी नाईक, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा