Home ताज्या बातम्या के.एन.एफ.सी फुटबॉल लीग स्पर्धेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : के.एन.एफ.सी च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित के.एन.एफ.सी फुटबॉल लीग स्पर्धेचे केक कापून शुभारंभ करण्यात आले. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना फुटबॉल किट वाटप करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, के.एन.एफ.सी चे अध्यक्ष सलीम खान (AIFF, सर्टिफाइड कोच) , सोहेल खत्री (संतोष ट्रॉफी प्लेअर महाराष्ट्र कप्तान), मनोज देढीया, प्रशिक्षक अक्षय साष्टे (AIFF, सर्टिफाइड कोच), सहकारी मंगेश अपराज, दर्शन कर्डीले, प्रदीप शेलार तसेच खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.