शासकीय दाखले वाटप शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
147

पनवेल :  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज पहिले शिबीर खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे पार पडले.

          कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेव पाटील, युवा नेते विनोद घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष दिनेश खानावकर, नगरसेवक अभिमन्य पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर गीता चौधरी, बिना गोगरी, तसेच मनीषा पाटील, संजय बिक्कड, डी. एल. पवार, प्रकाश लोंढे, निर्दोष केणी, स्मिता गोडबोले, प्रसिका शिंदे, मीनाक्षी घाटे, जान्हवी मानकामे आदी तहसील कार्यालय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

         रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणी नुसार या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.