Home ताज्या बातम्या ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेश गायकर यांची नियुक्ती
पनवेल : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी कामोठे येथील राजेश गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, पनवेल शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, संतोष भोईर, युवा नेते दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत, गणेश गायकर, आप्पा भागीत, जनार्दन पाटील, प्रवीण खंडागळे आदी उपस्थित होते. राजेश गायकर यांनी यापूर्वी रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस म्हणून काम केले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळत विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो तसेच जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्यावर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.