ओएनजीसी सीआयएसएफ कडून देशाचा 75 वा अमृत महोत्सव साजरा

0
153

       उरण : ओएनजीसी सीआयएसएफ उरण – मुंबई कडून देशाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आर टी सी बैंड पथकानी देश भक्ति वर गीत सादर केली.देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ओएनजीसी मुंबई येथील कमांडर ललित शेखर झा व जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णु स्वरूप यांनी ओएनजीसी प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी आय एस एफच्या जवानांचा व बैंड पथक जवानांचा गौरव केला.
आज देश भरात आपल्या देशाचा 75 वा स्वातंत्र्य अमूत महोत्सव साजरा केला जात आहे. या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.हि एक अभिमानास्पद बाब आहे. अशा जवानांच्या खांद्याला खांदा लावून सीआयएसएफचे जवानही देश पातळीवर काम करत आहेत. असे उदगार ओएनजीसी मुंबई येथील कमांडर ललित शेखर झा यांनी व्यक्त केले. यावेळी जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णू स्वरूप, उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संतोष पवार,उरण ओएनजीसी सिक्युरिटी इंचार्ज वीरेंद्र सिंह, चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश थळी, डॉक्टर सुरेश पाटील पोलिस निरीक्षक सुहास चौहान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक दिलराज मिना यांनी केले.