आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठव विरेश धोत्रे यांच्या शिवसमर्थ फिटनेस क्लबचे शानदार उद्घाटन

0
382

दै.रायगड नगरी । बदलापूर

     बदलापूर पूर्व स्टेशन पाडा येथे आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठव पट्टू विरेश धोत्रे यांच्या शिवसमर्थ फिटनेस क्लबचे भव्य उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि ज्येष्ठ प्रशिक्षक, फिटनेस आयकॉन मनिष अडीविलकर, मि.वर्ल्ड सागर कातुर्डे, समीर दाबिलकर, आ.किसन कथोरे, शिवसेना मा.जिल्हाप्रमुख मनोहर आंबवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी टीम मास मुंबईचे सर्व सदस्य, उपशहरप्रमुख प्रवीण राऊत, उद्योजक अनिल तिवारी, नगरसेविका सौ.उज्वला आंबवणे, सौ.शितल राऊत, सौ.स्वाती धोत्रे, विभागप्रमुख उल्हास आंबवणे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा कांबरी, नगरसेवक राजन घोरपडे, संजय भोईर, तुकाराम म्हात्रे, अनिल भगत, मा.नगराध्यक्ष प्रियेश जाधव, सौ.रती पातकर, युवा सेना शहराध्यक्ष रोहन पाटील, पनवेल शेकाप नेते अतुल भगत, मनसे शहराध्यक्ष जयेश कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कालिदास देशमुख, प्रदीप गीते, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेली 2 वर्षापासून कोरोना काळात फिटनेसबाबत नागरिक जागृत झाले असून आपले स्वास्थ शरीर उत्तम राहण्यासाठी शरिराला आकार देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी व्यायामशाळा या महत्वाचे कार्य करीत आहेत. बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशन जवळ असणार्‍या या भव्य दुमजली प्रशस्त शिवसमर्थ फिटनेस क्लबमध्ये अत्याधुनिक उपकरणे, साधने असून पुरुष व महिला वर्गासाठी देखील योग्य मार्गदर्शन केले जाईल. 20 ते 22 वर्षे चिकाटीने व्यायाम क्षेत्रात सातत्य ठेवून अनेक शरिरसौष्ठव स्पर्धेमध्ये जिल्हास्तरिय, राज्यस्तरिय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा मेडल मिळवून बदलापूरचे नाव उंचावणारे विरेश धोत्रे हे शिवसमर्थ व्यायाम शाळेमध्ये स्वतः मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. याचा निश्‍चितच बदलापूरातील तरुण वर्गाला उपयोग होणार असून त्या व्यतिरिक्त इतरही उत्तम प्रशिक्षक मुला-मुलींना मार्गदर्शनासाठी या व्यायाम शाळेत उपलब्ध राहणार आहेत.